अल्पवयीन मुलीवर अत्याचार नराधमाला १० वर्षाची शिक्षा

27
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नांदेड

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या २३ वर्षीय आरोपीला नांदेडमधील कोर्टाने १० वर्ष सक्तमजुरी आणि चार हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश एस.आर.जगताप यांनी आरोपी शेख वसिमला कलम ३७६ आणि पोस्को कायद्यांन्वये ही शिक्षा सुनावली असल्याची माहिती अ‍ॅड.नितीन कागणे यांनी दिली.

नांदेडपासून जवळच असलेल्या शेंबोली येथील शेख वसिम शेख फतेह अहमद (२३) याने एका १६ वर्षीय बालिकेसोबत सूत जुळवले होते. या प्रेमसंबंधातून पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. मुलगा जन्मल्यानंतर आरोपी वसिमने पीडित मुलीला दिलेले लग्नाचे वचन विसरला आणि आपल्या प्रेमसबंधांना नकार दिला. अखेर पीडित मुलीच्या पालकांनी बारड पोलीस ठाण्यात वसिम विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलीस चौकशी दरम्यान डीएनए चाचणीत वसिम शेखचा डीएनए आणि पीडित अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या मुलाचा डीएनए एकसारखा आढळला. त्यानंतर न्यायालयात वसिमविरोधात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या