मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवामुळे ‘बेस्ट’ 98 मार्गांवरील वाहतूक वळवली. दादर एम.सी. जावळे मार्गावरील दहीहंडी उत्सवामुळे बस मार्ग क्रमांक 118 चे प्रवर्तन सकाळी 6.15 वा.पासून कबुतरखाना येथे खंडित करण्यात आले. विक्रोळी टागोर नगर पोस्ट ऑफिस येथील दहीहंडीमुळे बस मार्ग क्रमांक 453,185 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमार्गे सायंकाळी 5.30 वाजल्यापासून वळविण्यात आले होते. दहीहंडीमुळे बस मार्ग क्रमांक 287 व 629 चे प्रवर्तन ठाकूर सिनेमा येथे सायंकाळी खंडित करण्यात आले. जरीमरी मार्गावरील दहीहंडीमुळे बस मार्ग क्रमांक 375, 505, 473, 374 हे टर्नर रोड, भाभा हॉस्पिटलमार्गे वळविण्यात आले होते. शिवाजीनगर बाजीप्रभू देशपांडे मार्गावरील बस मार्ग क्रमांक 8 व 379 हे मार्ग सकाळपासून शिवाजीनगर आगारातून वळविण्यात आले. भांडुप येथील नरदास नगर येथील दहीहंडीमुळे बस मार्ग क्रमांक 605 वळविण्यात आले होते. वैभव चौक येथे हा मार्ग खंडित करण्यात आले होते. एस.एस. राव मार्गावरील गोपाळ नाईक चौक येथे दहीहंडी असल्यामुळे बस मार्ग क्रमांक 217 चे विद्यमान मिंट कॉलनी येथील गांधी रुग्णालय येथे खंडित करण्यात आले. भांडुप गाव रस्त्यावर दहीहंडी बांधल्यामुळे बस मार्ग 307 च्या बसेस हिरानगर ते भांडुप पोलीस स्टेशनदरम्यान भांडुप सोनापूर, शास्त्री मार्गाने वळविण्यात आले होते.
चिमुकल्या गोविंदाला वाघनखांचे बक्षीस
शिवसेनेच्या वतीने शिवसेना भवन येथे शिवसेना नेते– खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली
युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या वतीने ‘निष्ठा’ दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी वरळी येथील उदय क्रीडा मंडळ महिला गोविंदा पथकाने शिस्तबद्ध मनोरा रचून शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्वयंरक्षेसाठी उपयुक्त ठरणाऱया वाघनखांचे पारितोषिक पटकावले. यावेळी माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत उपस्थित होते.
शिवसेना शाखा क्रमांक 192 च्या वतीने शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांनी बँक ऑफ इंडियाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा केला. या कार्यक्रमाला महिला गोविंदांनी सलामी दिली व महिला अत्याचाराविरोधात बॅनर झळकवला. यावेळी शिवसेना नेते- खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते दिवाकर रावते आदी उपस्थित होते.
शिवसेना शाखा क्र. 64 व अखिल आंबोली सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित दहीहंडी उत्सव 2024चे विजेते अखिल केवणी पाडा दहीकाला पथक यांनी दहीहंडीचा मान मिळवला. यावेळी विभागप्रमुख हारून खान, उपविभागप्रमुख मजहर खान, शाखाप्रमुख एकनाथ केरकर, महिला शाखा संघटक विनिता घाडगे, युवा अधिकारी मदर खान, ग्राहक संरक्षण कक्षाचे रमेश मालवणकर, रवींद्र चिले, उपशाखाप्रमुख तुषार राऊत, दुर्गेश घाग, राजू मोरे, उदय यादव, हेमंत मयेकर आदी उपस्थित होते.
आमदार सुनील राऊत यांच्या माध्यमातून विक्रोळी शिवसेना आयोजित मानाची हंडी स्वामी समर्थ मित्र मंडळाने आठ थर लावून फोडली. त्याप्रसंगी आमदार सुनील राऊत शिवसेना उपनेते दत्ता दळवी, शेखर जाधव, शाखाप्रमुख अभय राणे, परम यादव, रश्मी पावडर, गावडे शंकर ढमाले यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱयांच्या हस्ते विजेत्यांना सन्मान चषक देऊन गौरविण्यात आले.
शिवसेना शिवडी विधानसभा व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने परळ येथील कामगार मैदानामध्ये आमदार अजय चौधरी यांच्या सहकार्याने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. सदर दहीहंडी उत्सवात शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू दादा सकपाळ, शाखाप्रमुख मिनार नाटळकर, शिव आरोग्य सेनेचे जीतेंद्र सकपाळ आदी उपस्थित होते. या दहीहंडी उत्सवाचे संयोजन अभिषेक जामदार व बाबू गुप्ता यांनी केले.
दहीहंडी उत्सवात दिव्यांगांचा उत्साहदेखील वाखाणण्यासारखा होता. दादरमध्ये अंधांनी शिस्तबद्ध मनोरे उभारून उपस्थितांचे लक्ष वेधून सर्वांची मने जिंकली.
शिमला हाऊस मंडळाने सलग दुसऱया वर्षी ममता चषक पटकावला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, उपनेते सचिन अहिर, उपनेते राजकुमार बाफना, आमदार सुनील शिदे, उपनेते अरुण दुधवडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
शिव-कोळीवाडा विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार व जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत भिसे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीत अॅण्टॉप हिलच्या बाळगोपाळ मंडळाने बाजी मारली. यावेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे, विधानसभा निरीक्षक शिवाजी गावडे, विधानसभा संघटक गजानन पाटील, विनायक तांडेल, आनंद जाधव, उपविभाग प्रमुख राजेश कुचिक, दत्ता भोसले, प्रभाकर भोगले, विधानसभा समन्वयक रवींद्र परब, रणजीत चोगले, उपकार खोत, रामदास कांबळे, शाखाप्रमुख संजय म्हात्रे उपस्थित होते.
जोगेश्वरी पूर्व मेघवाडी येथील हिंदमाता दहीहंडी पथकाने मुंबई आणि ठाणे येथे आयोजित दहीकाला उत्सवांत आठ थरांची यशस्वी सलामी दिली.
शिवसेना शाखा क्रमांक 206 शिवडी काळाचौकीच्या वतीने दिवंगत शाखाप्रमुख निवांत घेरडे चौक, शिवडी नाका या ठिकाणी दहीहंडी आयोजित केली. या वेळी शिवसेना आमदार अजय चौधरी, महिला उपविभाग संघटिका श्वेता राणे, महिला शाखा संघटक शुभदा पाटील, युवासेना शाखा अधिकारी रोहित गायकवाड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना माजी नगरसेवक सचिन पडवळ, शाखाप्रमुख हनुमंत बैजू हिंदोळे यांच्यामार्फत करण्यात आले.
शिवसेना आणि ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्र आयोजित दहीकाला उत्सवात अमर सुभाष गोविंदा पथकाने सात थर लावून दहीहंडी पह्डली. या मंडळाचा शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख रक्कम आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, आयोजक उपविभागप्रमुख यशवंत विचले, सायली विचले, पत्रकार भीमराव धुळप, माजी शाखाप्रमुख सिद्धार्थ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.