१०० शास्त्रज्ञांचे पुस्तक

नितीन फणसे,samananitin@gmail.com

मराठीतून विज्ञान प्रसार करण्यासाठी ‘मराठी विज्ञान परिषद’ ही संस्था अनेक कार्यक्रम करत असते. त्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यातच एक उपक्रम म्हणजे दैनिकात सदर चालवणे. आजवर मध्यवर्ती संस्थेने व परिषदेच्या विभागांनी काही वर्तमानपत्रांत अशी सदरे चालवली. एका वृत्तपत्रात २००६ साली सुरू झालेले सदर या परिषदेने ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सलग १२ वर्षे चालवले. दरवर्षी वेगळा विज्ञान विषय घेऊन ३०-३२ लेखकांचा गट या सदरात वर्षभर जवळजवळ २५० लेख लिहिले. विशेष म्हणजे ग्रामीण शाळात हे सदर रोज प्रार्थनेनंतर वाचले जाते. बरेच विद्यार्थी याची कात्रणे काढून ती चिकट बुकात चिकटवतात.

यापूर्वीची वैद्यक आणि अभियांत्रिकीवरील संपूर्ण सदरांची पुस्तके दोन प्रकाशकांनी प्रसिद्ध केली आहेत. संपूर्ण सदर नाही, पण त्याचा काही भाग ‘१०० वनस्पती शास्त्रज्ञ’ या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आलाय. विज्ञानलेखक अ. पां. देशपांडे यांनी संपादित केले असून पंडित पब्लिकेशनने ते प्रकाशित केले आहे. वर्ष २०१६ सालचा विषय होता वनस्पतीशास्त्र. त्यात लिहिणाऱया लेखकांचे लेख तपासण्यासाठी तज्ञ म्हणून प्रा. शरद चाफेकर, प्रा. चंद्रकांत लट्टू आणि प्रा. नागेश टेकाळे यांनी काम केले. या सदरात फळझाडे, फुलझाडे, भाज्या, पिके, औषधी कनस्पती, काळकंटी प्रदेशातील कनस्पती, पाणथळ जागेतील वनस्पती, डोंगर उताराकरील वनस्पती अशा अनेक प्रकारच्या वनस्पतींची माहिती तर दिली आहेच, पण ४२ कनस्पती शास्त्रज्ञांची माहितीही दिली. ही माहिती दर शुक्रवारी दिली. हे सगळे शास्त्रज्ञ हिंदुस्थानी होते, तीनच अपवाद. गॅम्बल, कुक आणि गार्सिआ डा आर्टा या परदेशी शास्त्रज्ञांचा. पण त्यांची कारकीर्द हिंदुस्थानातच हिंदुस्थानातच घडल्याने त्यांची चरित्रे यात समाविष्ट केली आहेत.

हे सदर कोकणातील कणकवलीचे निसर्गप्रेमी कामन पंडित नियमितपणे वाचत होते. त्यांनी ‘१०० वेलीफुले’ असे एक पुस्तक प्रकाशित केले आहे. पुढे डिसेंबर २०१७ मध्ये वामन पंडितांच्या कणकवली गावाजवळच्या कुडाळ येथे विज्ञान परिषदेचे ५२ वे वार्षिक अधिवेशन भरवायचे ठरले. ही चरित्रे जशी या लेखकांनी लिहिली तशी या संपूर्ण प्रकल्पासाठी मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान विभागातील अधिकारी सुचेता भिडे यांनी सहाय्य केले.

वर्तमानपत्रात आलेल्या सदरात फक्त ४२ चरित्रेच प्रसिद्ध झाली. पण निसर्गप्रेमी कामन पंडित यांनी पूर्वी १०० वेलीफुलांचे पुस्तक प्रकाशित केल्याने त्यांना १०० वनस्पतीशास्त्रज्ञांची चरित्रे हवी होती. वर्तमानपत्रातील सदर ३१ डिसेंबर २०१६ रोजी संपताच त्यांना हे पुस्तक प्रसिद्ध करायची इच्छा होती. पण त्याला आम्ही कमी पडलो, कारण ही चरित्रे लिहिणारे जवळजवळ सर्व लेखक निवृत्त झाले होते. म्हणून ही १०० चरित्रे पुरी करता करता सप्टेंबर २०१७ उजाडला, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.