जमैकाच्या फ्रेजर प्राइजला विक्रमी वेळेसह सुवर्ण पदक, पाच वर्षांच्या मुलाच्या आईची कमाल

तीन वेळा 100 मीटर्समध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणाऱ्या शैली एन. फ्रेजर प्राइज या जमैकाच्या महिला धावपटूने वयाच्या पस्तिशीतही आपला चपळपणा कायम असल्याचे सिद्ध केले. तिने विक्रमी वेळेत फ्रान्समधील डायमंड लीग स्पर्धेत विक्रमी वेळे नोंदवत सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम साकारला आहे. फ्रेजर प्राइजने या स्पर्धेतील 100 मीटर दौड 10.67 सेकंद या विक्रमी वेळेत जिंकली आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांच्या मुलाची आई असलेल्या शैलीच्या या पराक्रमाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

शनिवारी  फ्रान्सच्या स्टेड कार्लेटी येथे फ्रेजर प्राइस हिने  गेल्या महिन्यात केनियातील किप कीनो क्लासिक स्पर्धेतील आपल्या विक्रमी वेळेची बरोबरी साधली. शिवाय तिने दोन वेळची ऑलिम्पिक विजेती एलेन थॉम्पसन हेरा हिचा विक्रमही 72 सेकंद कमी वेळ घेऊन मोडीत काढला. हेराने गेल्या वर्षी तो विक्रम साकारला होता. आता फ्रेजर प्राइज आपल्या कारकीर्दीतील दहाव्या सुवर्णपदकासाठी ऑरेंजन येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उतरणार आहे. यापुढची डायमंड लीग स्वीडनच्या स्टॉकहोम येथे 30 जूनला होणार आहे.

फ्रेजरच्या  100 मीटर्समधील सर्वोत्तम वेळा

स्वित्झर्लंड  2021       10.60 सेकंद

जमैका       2021       10.63 सेकंद

केनिया      2022       10.67 सेकंद

फ्रान्स        2022      10.67 सेकंद

जमैका       2012      10.70  सेकंद