रत्नागिरीत 101 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

534

रत्नागिरी जिल्ह्यात 101 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 391 झाली आहे. तर गेल्या 24 तासात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 83 झाली आहे. खेड तालुक्यातील पुरेखुर्द येथील 49 वर्षीय रुग्णाचा रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. चाकाळे (ता.खेड) येथील 66 वर्षाच्या रुग्णांचा रत्नागिरी येथे दाखल करण्यास आणत असताना प्रवासादरम्यान मृत्यू झाला. हर्णे (ता. दापोली) येथील 70 वर्षीय रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी – 46, दापोली-08, कळंबणी-06, कामथे-27 येथील रुग्णांचा समावेश आहे. तर मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातून 3, संगमेश्वर 1, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा 5, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे चिपळूण 14, कोव्हीड केअर सेंटर रीम्झ हॉटेल 1 अशा एकूण 26 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेले 3 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 1597 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या