१०१ वर्षाच्या आजीबाईंनी दिला १७ व्या बाळाला जन्म

50

सामना ऑनलाईन । इटली

इटलीत राहणाऱ्या १०१ वर्षाच्या आजीबाई १७ व्यांदा आई झाल्याने वैद्यकीय विश्वात खळबळ उडाली आहे. अनातोलिया व्हर्टाडेला असे या महिलेचे नाव असून या वयात आई होणे ही परमेश्वराची ईच्छा असल्याचं त्यांच म्हणण आहे.

सोळा मुलांची आई असलेल्या अनातोलिया व्हर्टाजेला यांना वयाच्या ४८ व्या वर्षी गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर कृत्रिम गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्या पुन्हा आई होतील याची शाश्वती नसल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या पतीला सांगितले होते. वाढत्या वयाबरोबर महिलांची प्रजनन क्षमता कमी होणे हे यामागचे मुख्य कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते.

पण वयाची शंभरी ओलांडल्यानंतर अनातोलिया यांना पुन्हा एकदा मातृत्वाची चाहूल लागल्याने त्यांच्यासह डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. ही अशक्य कोटीतील गोष्ट असल्याने अनातोलिया यांचे बाळंतपण हे डॉक्टरांपुढे मोठे आव्हान होते. त्याचबरोबर अनातोलिया यांची कृत्रिम गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आणि गर्भपात युरोपीय कायद्याच्या विरोधात असल्याने व्हर्टाडेला कुटुंबासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले होते. अखेर अनातोलिया यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ९ पौंड वजनाच्या एका गोंडस मुलाला जन्म दिला. यावेळी त्यांच्यासोबत त्याची १६ मुलं, नातवंडे, पतवंडे असे संपूर्ण कुटुंब होते.

आपली प्रतिक्रिया द्या