अभी तो मैं जवान हूँ… 103 वर्षांच्या आजीबाईंनी गोंदवला टॅटू

595
dorothy-pollack-103-old-lady

वय वाढलं तरी मन टवटवीत असेल तर जीवन जगण्यास आणखी गंमत येते. जीवनाचा पुरेपुर आनंद घेणाऱ्या अशाच एका आजींची माहिती आज तुम्हाला देत आहोत. या आजीबाई 103 वर्षांच्या आहेत. त्यांनी एक यादी तयार केली आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या इच्छा लिहिल्या आहे. मनात राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आता पहिला टॅटू बनविला आहे.

सीएनएनच्या वृत्तानुसार, 16 जून रोजी या आजी 103 वर्षांच्या झाल्या. डोरोथी पोलॅक असे त्यांचे नाव आहे. त्यांनी आपला वाढदिवस कोरोनामुळे रुग्णालयात विलगिकरण कक्षात घालविला. त्या अमेरिकेच्या रहिवासी आहेत. मिशिगनमधील इस्पितळात त्यांना ठेवण्यात आलं.

टेरेसा जाव्हिट्झ-जोन्स ही त्यांची नात. ती म्हणते, “कोविड 19 मुळे अनेक महिने त्यांच्यासाठी जेलमध्ये असल्यासारखे झाले आहे.” त्यांची देखभाल करण्यासाठी आमच्या घरी आलेल्या नर्सने सांगितले की त्या अस्वस्थ आहेत. आपल्या त्यांना यातून बाहेर आणावे लागेल. जरी मी आजीचे म्हणणे ऐकले नाही, त्यांना आता ऐकू येत नसल्याने फोन वर बोलणं शक्य नव्हतं. ‘

आजी बरं झाल्यानंतर म्हणायची की मला टॅटू करायचा आहे. आजी म्हणते की, “आधी माझा नातू मला टॅटू काढ म्हणायचा पण मी ऐकत नव्हते. पण आता मला टॅटू काढायचे आहेत. मला बेडूक आवडतात म्हणूनच मला बेडकाचा टॅटू काढून द्या.’

frog-tatoo

रे रीझनर (जूनियर) एक टॅटू कलाकार आहे ज्याने आजीला टॅटू काढून दिले आहे. तो म्हणाला, ‘आजी खूप खूश होत्या, हा एक आश्चर्यकारक अनुभव होता’. एवढेच नाही तर आजीला बाईक राईड करायची होती. त्यांनी त्याचा ही आनंद घेतला. सीएनएनने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

फोटो सौजन्य: सीएनएन

आपली प्रतिक्रिया द्या