हिंदुस्थान-बांग्लादेश सीमेवर १०७ जनावरांची मुंडकी जप्त

10

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

मेघालयातील हिंदुस्थान-बांग्लादेश सीमेवर शनिवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी  जनावरांची तस्करी करणारया टोळक्याला बीएसएफच्या जवानांनी अटक केली आहे. यावेळी १०७ जनावरांची मुंडकी आणि ग्रेनेडचा साठा जप्त करण्यात आला आहे.

मेघालयातील हिंदुस्थान-बांग्लादेश सीमेवर रात्रीच्यावेळी जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती बीएसएफला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे जवानांनी गुरुवारपासूनच शोध मोहीम सुरु केली होती. शुक्रवारी रात्री सीमेला लागूनच असलेल्या गारो आणि खासी टेकडी भागात संशयास्पद हालचाली होत असल्याचे जवानांच्या लक्षात आले. त्यानंतर जवानांनी तस्करांना शरण येण्याचे आवाहन केले, पण तस्करांनी अंधाराचा फायदा घेत जवानांच्या दिशेने ग्रेनेड फेकले व बांग्लादेशच्या दिशेने पळ काढला.  जवानांनी पाठलाग करुन काही तस्करांना पकडले. यावेळी ८८ जनावरांची मुंडकी जप्त करण्यात आली. तर दुसरीकडे सीमेवरील खासी येथील लायनखाट भागातून १९ जनावरांची मुंडकी जप्त करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय  बाजारात या मुंडक्यांची किंमत ३ लाख रुपये आहे.

.

आपली प्रतिक्रिया द्या