रत्नागिरी जिल्ह्यात १०८६ बंधारे पूर्ण

55

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

उन्हाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जि़ल्हा परीषद कृषी विभागाकडून ‘मिन बंधारे’ ही मोहिम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये ८४५० बंधारे उभारण्यात येणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १०८६ बंधारे उभारण्यात आले असून त्यामध्ये २२३ वनराई बंधारे, ४२२ विजय बंधारे आणि ४४१ कच्च्या बंधाऱ्यांचा समावेश आहे.

पावसाचे पाणी बंधारे बांधून ते अडवल्यामुळे मार्च महिन्यानंतर पाणी टंचाईच्या काळात त्याचा उपयोग होतो़ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर मिन बंधारे राबवण्यात येत आहेत. जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतींना किमान १० बंधारे बांधण्याचे उदि्दष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींना ४९० बंधारे, दापोलीमध्ये १०६ ग्रामपंचायतींना १०६० बंधारे, खेडमध्ये ११४ ग्रामपंचायतींना ११४० बंधारे, चिपळूणमध्ये १३० ग्रामपंचायतींना १३०० बंधारे, गुहागरमध्ये ६५ ग्रामपंचायतींना ६५० बंधारे, संगमेश्वरमध्ये १२६ ग्रामपंचायतींना १२६० बंधारे, रत्नागिरीमध्ये ९४ ग्रामपंचायतींना ९४० बंधारे, लांजामध्ये ६० ग्रामपंचायतींना ६०० बंधारे आणि राजापूरमध्ये १०१ ग्रामपंचायतींना १०१० बंधाऱ्यांचे उदिदष्ट ठेवण्यात आले आहे.

ग्रामपंचायतस्तरावर बंधारे बांधण्याची मोहीम आता सुरु झाली असून आतापर्यंत मंडणगड तालुक्यात ७१ बंधारे उभारण्यात आले आहे. दापोलीमध्ये ३१६, खेडमध्ये ८०, चिपळूणमध्ये ११३, गुहागरमध्ये १४५, संगमेश्वरमध्ये ११०, रत्नागिरीमध्ये २९, लांजामध्ये ११९, राजापूरमध्ये १०३ बंधारे उभारण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या