महिलेच्या पोटातून काढला 11 किलोचा ट्युमर, चेंबूरच्या झेन रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईतील एका 55 वर्षीय महिलेच्या पोटातून चक्क 11 किलोचा ट्युमर काढल्याची घटना समोर आली आहे. चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. सुजाता सिन्हा ( बदलले नाव) या चेंबूरमध्ये राहणाऱया आहेत. काही महिन्यांपासून त्यांच्या ओटीपोटीत तीव्र वेदना जाणवत होती. तपासणी केली असता, पोटामध्ये गाठ असल्याचे आढळून आले. साधारणतः नऊ तास शस्त्रक्रिया केल्यानंतर मोठय़ा शर्थीने डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून ही गाठ काढली आहे. झेन रुग्णालयातील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तनवीर अब्दुल माजीद यांच्या नेतृत्वाखाली यूरोलॉजिस्ट डॉ. संतोष पालकर आणि भुलतज्ञ डॉ. शिल्पा देशमुख यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या