अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

सामना ऑनलाईन । मुंबई
अकरावी ऑनलाइन प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कट ऑफ घसरला आहे. यावर्षी मोठ्या संख्येने दहावीच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्यामुळे नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे.
पहिल्या यादीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यामुळे कट ऑफ कमी झाली आहे, असे हिंदुजा कॉलेजच्या प्राचार्या मिनू मदलानी यांनी सांगितले. आमच्या कॉलेजमध्ये पहिल्या यादीतच ७५ टक्के जागा भरल्या आहेत. त्यामुळे आम्ही लेक्चर्स वेळेवर सुरू करू शकतो. आता दुसऱ्या यादीत आमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अकरावीची कटऑफ याप्रमाणे आहे… (आकडे टक्केवारीत)
रूईया विज्ञान ९०.८०, कला ९०.६०; गेल्यावर्षी अनुक्रमे ९३.२ आणि ९१.८ होती
हिंदुजा वाणिज्य ८०.०४; गेल्यावर्षी ८६.२
निवडक महाविद्यालयांची कटऑफ… (आकडे टक्केवारीत)
रुपारेल – कला ८२.८०, वाणिज्य ८७.५७, विज्ञान ९१.२०
रुईया – कला ९०.६०, विज्ञान ९०.८०
केसी – कला ८२.८३, वाणिज्य ८८.८०, विज्ञान ८५.४०
साठ्ये – कला ७२, वाणिज्य ८६.२०, विज्ञान ९१
पेस ज्यु. ठाणे – विज्ञान ९४
एन एम – वाणिज्य ९१.८३
मिठीबाई – कला ८३.९०, वाणिज्य ८७.६०, विज्ञान ८५.१७
वझे-केळकर – कला ८३.८०, वाणिज्य ८९.६०, विज्ञान ९२.६०
आपली प्रतिक्रिया द्या