पुनर्वसीत अकरा गावांचा पाणीप्रश्न पेटला, तरुणांच्या धरणात उड्या

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

जिल्ह्यातील माजलगाव शहर परिसरातील ११ पुनर्वसित गावातील पाणी प्रश्न सुरळीत करावा मागणीसाठी या गावातील ११ तरुणांनी शनिवारी ११ वाजता धरणातील पाण्यात उड्या घेतल्या.

पुनर्वसीत ११ गावांचा पाण्यासाठी रस्ता रोको, राष्ट्रीय महामार्ग ठप्प

खानापूर, शेलापुरी, रेनापुरी, देवखेडा, चिंचगव्हांन, नांदूर, पुनंदगाव, ब्रह्म गाव, मनुर, मनुरवाडी, काडीवडगाव या गावांतील पाणीपुरवठा नगर परिषदेबरोबर संयुक्त आहे. थकीत वीजबिलामुळे परिषदेने या गावांचा पाणीपुरवठा २० दिवसापासून बंद केला आहे. पाणापुरवठा पुन्हा सुरू करावा यासाठी शनिवारी मुक्तीरांम आबुज, पंडित आबुज, गजानन आबुज, पवन मूळे, विकास कांबळे, अनिल कांबळे, सचिन गात्वे, पांडुरंग आबुज, विनोद आबुज, गणेश मारगुडे, शिवाजी आबुज या तरुणांनी सकाळी ११ वाजता आंदोलन केले आणि धरणात उड्या टाकल्या.

आपली प्रतिक्रिया द्या