धक्कादायक! 13 वर्षाची मुलगी गरोदर, 10 वर्षाचा मुलगा झाला बाबा

1757

किशोरवयीन वय हे मुलांचे खेळण्या बागडण्याचे वय असते. मात्र याच वयात एक 13 वर्षाची मुलगी गरोदर राहिली आहे. तिने तिच्या गर्भातील बाळाचे वडिल हे तिचा 10 वर्षांचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले आहे. डरिया व इवान असे त्या दोघांचे नाव असून ते रशियातील झेलेनोगोर्स शहरात राहतात.

dariya-and-evan-1

डरिया ही सध्या आठ आठवड्यांची गरोदर असून तिने या बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात तिच्या आईनेही तिला साथ देण्याचे ठरवले आहे. डरिया गरोदर असल्याचे समजताच तिच्या आईला सुरुवातील धक्का बसला. त्यानंतर तिने तिचा बॉ़यफ्रेंड इवान (10) चे हे बाळ असल्याचे सांगितले. मात्र डॉक्टरांनी 10 वर्षाच्या मुलाच्या शुक्राणूंमध्ये गर्भधारणा राहू शकेल इतकी ताकद नसते असे सांगितले. मात्र डरिया हिने आपल्या आयुष्यात इवान व्यतिरिक्त दुसरा कोणताही मुलगा नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. तसेच इवानने देखील ते मूल त्याचेच असल्याचे मान्य केले आहे.

नुकतेच एका टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमात डरिया व इवान हे दोघेही सहभागी झाले होते. या चॅनेलवर ‘फादर अॅट 10’ हा कार्यक्रम घेण्यात आला होता. तेथे त्यांनी त्यांच्या नात्याविषयी सांगितले. दोन्ही मुलांच्या पालकांनी त्यांचे नाते स्वीकारले असून बाळाला जन्म देण्यात ते डरियाची मदत करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या