घरात घुसून अकरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार

341
girl-rape
सामना ऑनलाईन । मुंबई 
वांद्रे येथे ११ वर्षाच्या मुलीला चाकूचा धाक दाखवत तिच्या घरात घुसून एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी ही वांद्रे येथील एका चाळीत राहते. बलात्कार केल्यानंतर नराधमाने तिच्या घरातील १५ हजारांची रोकड व ४५ हजारांचे दागिने देखील चोरून नेलेत.

पीडित मुलीचे वडील हे सोमवारी नेहमी प्रमाणे कामाला गेले होते तर आई ही काही कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी दुपारी बाराच्या सुमारास तिचे आई वडील घराबाहेर पडल्याच्या काही मिनिटांतच कुणीतरी दारावरची बेल वाजवली. त्यानंतर मुलीने दरवाजा उघडला तेव्हा घराबाहेर असलेल्या व्यक्ती तिच्या पालकांविषयी चौकशी केली. आजूबाजूला तसेच मुलीच्या घरी कोणी नाही हे कळाल्यानंतर या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवत या मुलीला घरात ढकललं आणि दार बंद करून घेतलं. यानंतर तिच्याच ओढणीने तिचे हात बांधून ठेवले आणि मुलीवर बलात्कार केला. मुलीने ओरडून मदत मागायचा प्रयत्न केला मात्र त्या नराधमाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीवर बलात्कार केल्यानंतर त्याने कपाटातील दागिने व रोकड चोरली. त्यानंतर तो मुलीला घरातच लॉक करून पसार झाला.

जवळपास दीडच्या सुमारास जेव्हा मुलीची आई परतली तेव्हा मुलीला बघून तिला धक्काच बसला. मुलीचे हात बांधलेल्या अवस्थेत ती जमिनीवर पडलेली होती. मुलीच्या आईने याविषयी तत्काळ तिच्या वडिलांना कळविले. त्यानंतर तीनच्या सुमारास तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहेच. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात बलात्कार व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या