लातूर जिल्ह्यात संचारबंदीच्या 7 दिवसातच 1119 कोरोनाबाधित वाढले

1254

लातूर जिल्ह्यात संचारबंदीच्या काळातील ऑगस्ट महिन्यातील 7 दिवसातच 1119 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर 55.88 टक्के झाला आहे, तर जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचा दर सर्वाधिक 4 टक्के आहे.

लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, संचारबंदीच्या काळातच मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या संचारबंदीच्या 7 दिवसांतच जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1119 ने वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3348 वर पोहचली आहे. लातूरकरांसाठी समाधानाची बाब म्हणजे उपचारानंतर 1871 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 55.88 टक्के आहे. मात्र, जिल्हा प्रशासनासाठी अतिशय गंभीर बाब म्हणजे जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यूचा दर हा 4 टक्के आहे. मागील सात दिवसाच्या काळात जिल्ह्यात 36 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील 91 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन रविवारी घरी परतले. त्यामध्ये मुला-मुलींचे वसतीगृह बारा नं. पाटी लातूर येथील 54, सामान्य रुग्णालय उदगीर येथील 9, कोविड केअर सेंटर तोंडारपाटी ता. उदगीर येथील 3, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथील 7, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथील 4, मुलांची शासकीय निवासी शाळा मरशिवणी ता. अहमदपूर येथील 4, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील 4, कृषी पी.जी. कॉलेज चाकूर येथील 4, शासकीय वसतीगृह नवीन इमारत देवणी येथील 2 रुग्णांचा बरे झालेल्या रुग्णांमध्ये समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या