समाज माध्यमाद्वारे खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध 113 गुन्हे दाखल

1361

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच्या असताना राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सायबर विभागाने कडक पावले उचलली असून राज्यात समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध 113 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी समाज माध्यम बाबत अधिक सतर्क राहून महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे असे आवाहन   विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्यावतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  6 एप्रिल पर्यंत 113  गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक गुन्हे बीड जिल्ह्यात दाखले झाले असून त्यांची संख्या 15 आहे.  पुणे जिल्ह्यात 11, मुंबई 9, सातारा 7, जळगाव 7 , नाशिक ग्रामीण 6 , नागपूरमध्ये ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल  गुन्ह्यांमध्ये आरोपींनी फेसबुक किंवा व्हाट्सऍप वर पोस्ट टाकून किंवा शेअर करून त्याद्वारे कोरोना महामारीला जातीय रंग देऊन, त्या द्वारे धार्मिक तेढ व समाजात अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. अशाच प्रकारच्या  एका गुन्ह्याची नोंद लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देखील करण्यात आली. सदर आरोपी ने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकली, ज्यामुळे त्या परिसरात अशांतंता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या तक्रारी संपर्क साधावा

महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना आवाहन करते की कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या व्हॉटसअप किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media) पसरवू नयेत. तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशन कडे संपर्क साधावा असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.  सायबर गुन्ह्यांबाबतची  माहिती www.cybercrime.gov.in वर पाठवावी. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे व महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे असेही सरकारने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या