1154 ग्राहकांना चुना लावणारे गुडविन ज्केलर्सचे मालक अखेर शरण

923

ऐन दिवाळीत हजारो ग्राहक आणि गुंतकणूकदारांचे 1154 कोटींचे दिवाळे काढून फरार झालेले येथील गुडविन ज्वेलर्सचे मालक अखेर ठाणे न्यायालयात शरण आले. यावेळी लगेचच ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली. सुनीलकुमार अकराकरण आणि सुधीरकुमार अकराकरण अशी ठकसेन भावांची नावे आहेत.

डोंबिवली येथील मुख्य बाजारपेठेत गुडविन ज्वेलर्सचे भव्य शोरूम आहे, मात्र 20 ऑक्टोबरपासून शोरूम बंद झाले. चार दिवस शोरूम उघडले जात नसल्याने गुंतकणूकदारांचे धाबे दणाणले. दिवाळीसाठी ग्राहकांनी 25 हजारांपासून 25 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली होती. गुंतवणूकदारांचा संताप पाहून 26 ऑक्टोबरला पोलिसांनी शोरूमला सील ठोकून गुंतकणूकदारांची कोटय़वधींची फसकणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

 गंडा घालून केरळला पलायन
ठाण्यातील नौपाडा, शिवाजीनगर, डोंबिवली येथे गुडविन ज्वेलर्सचे तीन शोरूम होते. सोन्याचांदीचे दागिने विक्रीपोटी या व्यवस्थापनाने 1154 गुंतकणूकदारांकडून 25 कोटी रुपये आगाऊ घेतले होते, मात्र कुणालाही दागिने न देता 21 ऑक्टोबर रोजी शोरूम बंद करून मालक सुनीलकुमार अकराकरण आणि सुधीरकुमार अकराकरण कुटुंबांसह केरळला पळून गेले.

आपली प्रतिक्रिया द्या