साडेतीन वर्षांत ११८४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

32

सामना प्रतिनिधी । नागपूर

अस्मानी, सुलतानी संकट अन् कर्जाच्या ओझ्यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे गेल्या सतरा वर्षांच्या काळात एकट्य़ा नागपूर विभागात ३६३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले आहे तर, राज्यातील विद्यमान भाजप सरकारच्या गत साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या आत्महत्यांची संख्या ११८४ इतकी आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्यांबाबत माहिती मागितली होती. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांना दिलेल्या लेखी उत्तरातून उपरोक्त बाब पुढे आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या