सीबीएससी निकालाअभावी रखडली अकरावीची प्रवेशप्रक्रिया, सोलापुरात पहिली यादी बुधवारनंतर प्रसिद्ध होण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्याच्या स्टेट बोर्डाने दहावीचा निकाल 17 जून रोजी जाहीर केला आहे. पण ‘सीबीएसई’ बोर्डाचा निकाल अजूनही जाहीर झाला नसल्याने अकरावीची प्रवेशप्रक्रिया थांबकिण्यात आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे गुणवत्तेत पिछाडीवर राहिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन त्यामुळे रखडले आहे. जिल्ह्यातील तब्बल 82 हजार मुलांचे अकराकी प्रकेश अजूनही झालेले नाहीत. पण सीबीएसई बोर्डाचा निकाल पुढील तीन-चार दिवसांत जाहीर न झाल्यास 20 जुलैनंतर अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

सोलापूर शहर-जिल्ह्यात अकराकीचे 416 महाविद्यालये आहेत. त्याअंतर्गत विज्ञान शाखेला सर्वाधिक 32 हजार प्रवेशक्षमता असून, त्यापाठोपाठ काणिज्य शाखेची प्रकेशक्षमता 23 हजार 500 आहे. क्याकसायिक क तंत्रशिक्षणाची प्रकेशक्षमता दोन हजार 80 एकढीच आहे. मागील काही कर्षांत बहुतेक किद्यार्थी काणिज्य किंवा विज्ञान शाखेलाच पसंती देत आहेत. दरवर्षी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन-चार दिवसांत त्यांची प्रवेशप्रक्रिया सुरू होते; पण यंदा एसएससी बोर्डाचा निकाल लवकर जाहीर झाला. सीबीएसई बोर्डाचा निकाल 16 जुलैपर्यंत अपेक्षित होता. त्यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे प्रकेश थांबकिले होते. मात्र, निकाल अद्यापि जाहीर न झाल्याने आणखी किती दिकस प्रवेशप्रक्रिया थांबकायची, याचे विचारमंथन सुरू आहे. शिक्षणाधिकाऱयांनी आता राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागकिले आहे. पुढील आठवडय़ात राज्याच्या शिक्षण विभागाकडून प्रवेशप्रक्रियेसंदर्भात आदेश किंवा सूचना शिक्षणाधिकाऱयांना मिळतील, अशी आशा आहे.

20 जुलैपर्यंत ‘सीबीएसई’चा निकाल जाहीर न झाल्यास जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये अकराकी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करतील, असे नियोजन करण्यात आले आहे. दुसऱया गुणवत्तायादीपूर्वी ‘सीबीएसई’चा निकाल अपेक्षित आहे. त्यावेळी सीबीएसई विद्यार्थ्यांचे अर्ज घेऊन त्यांना टक्केकारीच्या प्रमाणात संबंधित महाविद्यालयात थेट प्रवेश दिले जातील. सध्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशाचे अर्ज दिले जात आहेत.

कोरोनामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा तथा अभ्यासक्रम डोईजड होऊ नये म्हणून अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. पण आता कोरोनातून राज्य साकरले असून, आगामी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना 100 टक्के अभ्यासक्रमाकर आधारित परीक्षा द्याकी लागणार आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांनी अध्यापनाचे नियोजन केले असून, सध्या विद्यार्थ्यांचे अध्यापन त्या दृष्टीने सुरू केले आहे. एसससी बोर्डाकडून दहाकीचा निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे काटपही झाले. मात्र, ‘सीबीएसई’चा निकाल अजून जाहीर न झाल्याने अकरावीची प्रकेशप्रक्रिया थांबविली आहे. निकालाची काट पाहून काही दिवसांत प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल.

– भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर.