रत्नागिरीत 12 रुग्णांना डिस्चार्ज; आतापर्यंत 534 रुग्णांची कोरोनावर मात

413

कोरोनावर मात करून बरे झालेल्या 12 रूग्णांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 534 झाली आहे. जिल्हा कोव्हीड रुग्णालयातून 1, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण येथून 8, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल येथून 3 अशा एकूण 12 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यात सकाळपासून 25 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 839 झाली आहे.सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 277 आहे. बीएसएनएल वसाहत, जेल रोड, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या 75 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 22 गावांमध्ये, दापोली मध्ये 8 गावांमध्ये, खेडमध्ये 14 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 20 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 5 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

जिल्हा रुग्णालयाकडून एकूण 11 हजार 674 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 11 हजार 435 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 814 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 10 हजार 586 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 239 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 70 हजार 198 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 91 हजार 507 आहे.

आपली प्रतिक्रिया द्या