पंचगंगा नदीत मिनी बस कोसळली, एकाच कुटुंबातील १३ जणांचा मृत्यू

25

सामना ऑनलाईन, कोल्हापूर

गणपतीपुळे इथून पुण्याला निघालेल्या १३ भाविकांचा कोल्हापूरजवळ दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंचगंगा नदीवर असलेल्या पुलावरून ही मिनी बस कोसळली असून रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे असं सांगण्यात येत आहे.

प्राथमिक वृत्तानुसार या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले पुणे येथील बालेवाडी, पिरंगुटचे रहिवासी असलेल्या भरत केदारी, संतोष वरखडे, दिनेश नांगरे यांचे कुटुंबीय आहेत. गणपतीपुळ्याला गणपती दर्शनासाठी हे सगळे गेले होते, तिथून कोल्हापुरात येताना शिवाजी पुलाचा कठडा तोडून एमएच १२ एनएस ८५५६ या नंबरची मिनी बस पंचगंगा नदीत कोसळली.

बुधवार पेठेतील स्थानिक लोकांच्या मदतीने इथे बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली होती, २ तासानंतर इथे बचाव पथकं आली आणि त्यांनी नदीत कोसलळलेल्या बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढायला सुरुवात केली. मात्र तोपर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला होता. प्रतीक दिनेश नागरे (१४), साहिल दिलीप केदeरी(१४), गौरी संतोष वरखडे(१३) आणि ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (१५) अशी यातील चार मृतांची नावं असून उरलेल्या मृतांची नावे कळू शकलेली नाहीत

आपली प्रतिक्रिया द्या