अकोला जिल्ह्यात 12 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; 35 जणांना डिस्चार्ज

574

अकोला जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाचे 123 अहवाल मिळाले आहेत. त्यातील 111 अहवाल निगेटिव्ह तर 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवार दुपारपर्यंत 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या पाच जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित 30 जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. शनिवारी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या 570 झाली आहे. तर सध्या 117 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 5224 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 4950, फेरतपासणीचे 110 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 164 नमुने होते. आतापर्यंत एकूण 5207 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 4933 तर फेरतपासणीचे 110 व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 164 अहवाल आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या 4637 आहे. तर पॉझिटिव्ह अहवाल 570 आहेत. तर आजअखेर 17 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात पाच महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण बाळापूर, आलेगाव पातूर, तसेच रामदासपेठ, शरीफ नगर, राधाकिसन प्लॉट, गायत्री नगर, फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. शनिवारी सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन महिला व दोन पुरुष आहेत. ते अकोट फैल, गायत्रीनगर, सिटी कोतवाली , मोहता मिल, सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी आहेत. शनिवारी पहाटे एका 71 वर्षीय वृद्धाचा उपचार घेताना मृत्यू झाला. हा रुग्ण साईनगर डाबकी रोड येथील रहिवासी होता. तो 24 तारखेला दाखल झाला होता.

35 जणांना डिस्चार्ज

शनिवारी दुपारनंतर 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील पाच जणांना घरी तर उर्वरित 30 जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. त्यात 13 महिला व 22 पुरुष आहेत. त्यातील सात जण हरिहर पेठ, चार जण गायत्रीनगर, कच्ची खोली दोन, जुने शहर दोन, अकोट फैल दोन, सिव्हिल लाईन्स दोन, मोठी उमरी दोन, गोकुळ कॉलनी दोन, तर आंबेडकर नगर, सागर कॉलनी, चांदखां प्लॉट, सोनटक्के प्लॉट, इंदिरा नगर, अडगाव, खदान, रामदास पेठ, शास्त्रीनगर, अशोकनगर, मोमीनपुरा, पार्वतीनगर डाबकीरोड येथील रहिवासी आहेत.

117 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत 570 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यातील 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 423 झाली आहे. तर सद्यस्थितीत 117 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एकजण कोविड केअर सेंटरला दाखल आहे. तर शनिवारी एका रुग्णाला नागपूर येथे संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.आतापर्यंत 4944 प्रवासी आले आहेत. त्यापैकी 2526 गृहअलगीकरणात तर 67 जण संस्थागत अलगीकरणात असे 2593 जण अलगीकरणात आहेत. तर 2180 जणांचा अलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर 171 रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या