पुण्याहून प्रशिक्षणानंतर परतलेल्या 12 पोलीस जवानांना कोरोना

पुणे येथील प्रशिक्षणाहून परतलेल्या नागपूर शहर पोलीस दलातील 12  पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने खळबळ माजली आहे. या सर्व पोलीस कर्मचाऱयांची आरटीपीसीआर करण्यात आली होती. दरम्यान, त्याना  संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप शिंदे यांनी दिली. या 12  पैकी 10  जणांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले होते, तर एकाचे अॅलर्जीमुळे लसीकरण झालेले नव्हते.

 शहर पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यांतील गुप्तचर  शाखेतील सुमारे 33  कर्मचाऱयांचे पुणे येथे 30  ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत डीएसबीचे प्रशिक्षण होते. हे प्रशिक्षण पूर्ण करून सर्व कर्मचारी 9  सप्टेंबरला परत आले. 20 जणांची आरटीपीसीआर चाचणी केली असता त्यातील 12  जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

आपली प्रतिक्रिया द्या