कर्जत-नेरळदरम्यान धावली १२० किमी वेगाने ट्रेन

सामना ऑनलाईन, मुंबई

मध्य रेल्वेने कर्जत आणि नेरळ या दोन स्थानकांदरम्यान १२० किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी धावू शकते का याची चाचणी घेतली, विशेष बाब म्हणजे ही चाचणी यशस्वी ठरली आहे. भविष्यामध्ये या मार्गावर अतिवेगाने रेल्वे गाड्या धावू शकतात की नाही यासाठी ही वेगचाचणी घेण्यात आली होती. पुणे आणि दक्षिण हिंदुस्थानाकडे याच मार्गाने गाड्या मार्गक्रमण करत असतात.

ही चाचणी यशस्वी झाली आणि चाचणीनंतर रेल्वे रूणांची स्थिती देखील उत्तम होती असं मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या या मार्गाने जाणाऱ्या गाड्यांचा सर्वाधिक वेग हा १०० ते ११० किलोमीटर प्रति तास इतका आहे. मात्र या नव्या वेग चाचणीनंतर हा वेग आणखी वाढण्यास मदत होईल. जेव्हा ही चाचणी घेण्यात आली तेव्हा रेल्वेचे सुरक्षा आयुक्त सुशीलचंद्रा आणि त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते.

मध्य रेल्वेचे अधिकारी आणि सुरक्षा आयुक्तांच्या पथकाने मुंबई-पुणे रेल्वे मार्गाचीही पाहणी केली. काही दिवसांपूर्वी खंडाळ्याजवळ असलेल्या बोगद्याचा भाग पडल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता तर काही कर्मचारी जखमी झाले होते. कर्मचाऱ्यांना सुरक्षेची सगळी खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं.

आपली प्रतिक्रिया द्या