मुंबईत कोरोनाचे 1,263 नवे रुग्ण; 44 कोरोनाबाधितांचा मृत्यू

667

मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1,263 नवे रुग्ण आढळले असून गेल्या 48 तासांत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 1,441 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 64 हजार 872 वर पोहोचली आहे.

मुंबईत 44 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 285 झाली आहे. मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 22 हजार 556 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचा डबलिंग रेट आता 50 दिवसांवर आला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 3 लाख 91 हजार 222 चाचण्या झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या