विक्रांत मेस्सी ‘बारावी फेल’

विधू विनोद चोप्रा यांचा आगामी चित्रपट ‘12 वी फेल’ची घोषणा झाली आहे. यामध्ये विक्रांत मेस्सी मुख्य भूमिका साकारणार आहे. अनुराग पाठक यांच्या गाजलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आहे.

 हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या वास्तविक जीवनातील कथेवरून प्रेरित आहे. चित्रपटाबद्दल विधू विनोद चोप्रा म्हणाले, जर प्रामाणिक व्यक्ती सत्तेच्या पदावर असेल तर जग खरोखर बदलू शकते. हा चित्रपट लिहिण्याच्या प्रक्रियेत मी असंख्य आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना भेटलो. जर हा चित्रपट आणखी 10 अधिकाऱ्यांना  प्रामाणिकपणासाठी प्रयत्न करण्यास प्रेरित करू शकतो, तसेच आणखी 10 विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेसाठी प्रेरणा देऊ शकतो तर मला विश्वास आहे.