‘त्या’ विद्यार्थ्यांवर 14 जणांचा बलात्कार, 10 पानांच्या सुसाईड नोटमध्ये दडलेले सत्य उघड

4881

चंद्रपूर शहरातील काँग्रेस सेवादलच्या वसतिगृहात बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अभ्यासिकेत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 18 जानेवारीला समोर आली होती. या आत्महत्याप्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. 14 जणांनी लैंगिक छळ केल्याने मुलाने आत्महत्या केल्याचे सत्य 10 पानांच्या सुसाईड नोटमधून समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेल्या मुलगा ज्या हॉस्टेलमध्ये राहात होता तेथील सहकारी त्याचे लैंगिक शोषण करीत होते. गेल्या एक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. 15 जानेवारीला या मुलाचा वाढदिवस होता यादिवशी देखील जवळपास 12 ते 15 मित्रांनी त्याच्यावर सामूहिक अत्याचार केला होता. यामुळेच त्याने आत्महत्या केली होती. सोमवारी पोलिसांना तपासादरम्यान एक वही आढळली. ज्यात मृतकाने त्याच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती नमूद केली आहे.

मागील एक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना होस्टेलचे अधिकारी काय करीत होते? त्यांना याची पुसटशीही कल्पना आली नाही का? हा सर्वात मोठा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. जर वेळीच यावर कारवाई झाली असती तर एका निष्पाप मुलाचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया जनमाणसातून उमटत आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 11 विद्यार्थी आणि 3 हॉस्टेल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांवर भादवी कलम 377 आणि पोक्सो कादद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या