सांगलीत कोरोना रुग्णाचा मृत्यू, जिल्ह्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू

573

सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचा तेरावा बळी गेला. सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सांगली शहरात आज आणखी तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता पाचशेच्या जवळपास गेली आहे.

सांगली शहरातील गणपती पेठेतील एका वृद्ध व्यापाऱ्याचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना   मुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 13 झाली आहे.

सांगली शहरात आज नव्याने तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले खणभाग, गणेश नगर, शामराव नगर परिसरातील हे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांना त्यांना मिरजेच्या शासकीय covid-19 रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे सध्या सांगली जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या पाचशे पर्यंत गेली आहे. सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जत तालुक्यातील बिळूर एक कोरोनाचं नवं हॉटस्पॉट बनले आहे. शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक म्हणजेच 129 आणि जत तालुक्यात 64 कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यत 270 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या