राजस्थानमध्ये लग्नाच्या वऱ्हाडाची बस नदीत कोसळली, 24 ठार

648

राजस्थानमधील कोटा लाससोट महामार्गावरून लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस नदीत कोसळली असून यात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे हा अपघात झाला असून चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट नदीत कोसळली.

ही बस कोटा येथून सवाई मधोपूर येथे जात होती. या मिनीबसची क्षमता 17 ते 20 प्रवाशांची होती. मात्र बसमध्ये 27 ते 28 प्रवासी होते. पहाटे सर्व प्रवासी झोपेत असताना बसचालकाचा बसवरील ताबा सुटला व ही बस पूलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली. या अपघातात 24 जणांचा मृत्यू झाला तर  5 जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या