सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 13 रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 69 वर

466

सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी मिळालेल्या 133 कोरोना तपासणी अहवालापैकी 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या अहवालात याआधीच कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीचा अहवाल रिपीट झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवे 13 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 119 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 17 महिन्यांच्या एका बाळाचा समावेश आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 69 झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 69 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 7 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 60 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कुल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, मौजे बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण, नाटळ येथील हायस्कुलची दुमजली इमारत, वैभववाडी तालुक्यातील मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, कुडाळ तालुक्यातील पणदूर – मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी असे कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. सोमवारी नव्याने कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांच्या अनुषंगाने कंटेन्मेंट झोन तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.

जिल्ह्यात एकूण 27 हजार 831 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी 404 व्यक्ती शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर 26 हजार 175 व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात 1 हजार 252 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 917 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 749 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 69 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 680 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 168 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 123 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 54 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 45 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये 24 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत सोमवारी 6 हजार 74 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. परराज्यातून व राज्याच्या इतर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 मेपासून आतापर्यंत एकूण 62 हजार 609 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या