तेरा वर्षाच्या मुलाचा कोरोनाने मृत्यू, आईने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर घेतले अंत्यदर्शन

1279

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून आतापर्यंत 59 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे त्यांच्या कुटुंबीयांना अंतिम दर्शन देखील घेता येत नाहीए. असाच दुर्दैवी प्रकार एका ब्रिटनमधील एका आईसोबत घडला असून तिच्या 13 वर्षाच्या मुलाचे अंतिम दर्शन देखील तिला व्हिडीओ कॉन्फरसिंगवर घ्यावे लागले.

ब्रिटनमधील ब्रिक्सटन शहरात राहणाऱ्या इस्माईल मोहम्मद अब्दुलवहब या 13 वर्षीय मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेला तो ब्रिटनमधील सर्वात लहान रुग्ण ठरला आहे. इस्माईलच्या आई व सहा भावंडांमध्ये देखील कोरोनाची लक्षण असल्यामुळे त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे इस्माईलचे अंत्यसंस्कार त्याच्या कुटुंबातील काही लोकांनी केले. त्याच्या अंत्यसंस्काराला त्याच्या आईला उपस्थित राहता आले नाही त्यामुळे या माऊलीला नातेवाईकांना व्हिडीओ कॉन्फरन्सवरून मुलाचे अंतिम दर्शन घडवले.

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 38 हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात पंतप्रधान बोरिस जॉन्सन व प्रिन्स चार्ल्स यांचाही समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या