13 वर्षाच्या सरोज खान यांनी 41 वर्षाच्या व्यक्तीसोबत केले होते लग्न

बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनावर बॉलिवूडमधील कलाकारांनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केल्या आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाला त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांची कोविड चाचणीही घेण्यात आली होती. मात्र, ती चाचणी निगेटिव्ह आली होती.

सरोज या फिल्म कोरियोग्राफर सोहनलाल यांच्यासोबत असिस्टंट म्हणून काम करत होत्या. सरोज या 13 वर्षांच्या होत्या तर सोहनलाल हे 41 वर्षांचे होते. आपल्या वयाच्या तिप्पट वयाच्या व्यक्तीसोबत सरोज प्रेमात पडल्या होत्या. सोहनलाल हे विवाहित होते त्यांना चार मुलंही होती. तरिही सरोज व सोहनलाल यांनी लग्न केले. त्यानंतर त्यांना एक मुलगाही झाला. मात्र त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. सोहनलाल सरोज पासून वेगळे झाले. त्यानंतर काही वर्षांनी सरोज खान पुन्हा सोहनलाल यांच्यासोबत असिस्टंट म्हणून काम करू लागल्या. त्या काळातच पुन्हा सोहनलाल त्यांच्या आयुष्यात आले. त्यांना एक मुलगी झाली. मात्र त्यानंतर सोहनलाल कायमचे चेन्नईला निघून गेले. पुन्हा एकदा सरोज खान एकट्या पडल्या. मात्र त्यांनी हार मानली नाही. त्या बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी झटत राहिल्या.

सरोज यांनी खरी ओळख मिळाली मिस्टर इंडियामधील त्यांच्या कोरियोग्राफीने त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. एका पेक्षा एक बेहतरीन कोरियोग्राफीन त्या बॉलिवूडमधल्या डान्सच्या सम्राज्ञी झाल्या. त्याच काळात त्यांच्या आयुष्यात व्यावसायिक सरदार रोशन खान आले. रोशन यांचेही लग्न झाले होते. मात्र त्यांना सरोज फार आवडायच्या त्यामुळे त्यांनी सरोज खान यांच्या सोबत लग्न केले. त्यानंतर सरोज व त्यांची पहिली पत्नी एकत्र राहायच्या.

आपली प्रतिक्रिया द्या