उत्तर प्रदेश भाजपात नाराजीची त्सुनामी, १३१ जणांचे राजीनामे

19

सामना ऑनलाईन। लखनऊ

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत तिकिटाच्या वाटपावरुन भाजपात नाराजीची त्सुनामी उसळली असून आतापर्यंत १३१ जणांनी राजीनामे दिले आहेत. यात ६ जिल्हा स्तरीय व इतर पदाधिका-यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांनी केंद्रिय मंत्री स्मृती ईराणी यांच्या पुतळ्याचे दहन करुन आपला संताप व्यक्त केला आहे.

गौरीगंज विधानसभा मतदारसंघात जिल्हाद्यक्ष उमाशंकर पांडे यांना उमेदवारी दिल्यावरुन गेल्या तीन दिवसांपासून गोंधळ सुरु आहे. पांडे यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या १३१ जणांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भाजप प्रयत्न करत असून अनेक जण आपला पक्ष  सोडून भाजपात सामील होत आहेत.यापार्श्वभूमीवर मत मिळवण्यासाठी भाजपात नव्यानेच सामील झालेल्या स्थानिक नेत्यांना उमेदवारी देण्याच येत आहे. यामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून जुन्या व नव्या समर्थकांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या