गुजरात विधानसभा निवडणुकीतील १३७ उमेदवार क्रिमिनल

49

सामना ऑनलाईन । मुंबई

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून ही निवडणूक लढवणाऱया ९७७ उमेदवारांमधील १३७ उमेदवार हे क्रिमिनल आहेत. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांबाबतचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. यामध्ये भाजप, काँग्रेस, बसपा आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या उमेदवारांनी आपल्यावरील गुह्यांची माहिती दिली आहे. त्याआधारे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रीफॉर्म्सने (एडीआर इंडिया) एक अहवाल बनवला आहे. ९७७ पैकी ९२३ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण एडीआरने केले. अन्य ५४ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे नीट स्कॅनिंग झाले नाही किंवा त्यांनी सादर केलेले पूर्ण प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही असे एडीआरने म्हटले आहे.

शेकडो कोटींची मालमत्ता असलेले उमेदवार
– इंद्राणीबेन संजयभाई राजगुरू, राजकोट (काँग्रेस) – १४१ कोटी
– सौरभ यशवंतभाई दलाल पटेल, बोताड (भाजप) – १२३ कोटी
– धनजीभाई पटेल, सुरेंद्रनगर (भाजप) – ११३ कोटी
– गुन्हे दाखल असलेले उमेदवार – १३७
– गंभीर गुन्हे असलेले उमेदवार – ७८
– खुनाचा गुन्हा असलेले उमेदवार – १
– खुनाचा प्रयत्नचा गुन्हा असलेले – ८
– महिलांबद्दलचे गुन्हे दाखल असलेल – २
– अपहरणाचे गुन्हे असलेले उमेदवार – ३

पक्षनिहाय क्रिमिनल उमेदवार
भाजप – २२
काँग्रेस – ८६
बहुजन समाज पार्टी – ११
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – ४
आम आदमी पार्टी – १९
अपक्ष – ३४

पक्षनिहाय करोडपती उमेदवार
भाजप – ७६ , काँग्रेस – ६०
बसपा – ६० , राष्ट्रवादी काँगेस – २८ , आप – १९ , अपक्ष – २५

आपली प्रतिक्रिया द्या