लातूर जिल्ह्यामध्ये प्रलंबित 63 अहवालात पुन्हा 14 कोरोना पॉझिटिव्ह आढळले

1400

लातूर जिल्ह्यामध्ये प्रलंबित असलेल्या 63 स्वॅबपैकी 14 जण कोरोना संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 682 वर जाऊन पोहोचली आहे.

लातूर जिल्ह्यातील 365 जणांचे नमुने शनिवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 63 जणांचे अहवाल प्रलंबित होते. त्यातील पुन्हा 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 41 एवढी झाली आहे. आता 14 नवीन रुग्ण वाढल्यामुळे लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 682 वर जाऊन पोहोचली आहे. लातूर जिल्ह्यातील 361 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रुग्णालयात 288 रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर 33 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या