दोन देशी कट्ट्यासह १४ तलवारी व ५ काडतूस जप्त

23

सामना प्रतिनिधी । अमरावती

विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाची स्टिकर असलेल्या सफारी वाहनातून गाडगेनगर पोलिसांनी १४ तलवारी,२ देशी कट्टे,पाच काडतूस जप्त केले आहे. त्यामुळे या शस्त्राचा संबंध एखाद्या राजकीय व्यक्तीच्या हत्येशी आहे काय? त्यामुळे अमरावतीच्या राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हदीत येणारया वलगाव रोड परिसरात पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकली त्यावेळी सफारी वाहनातून हा सर्व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. वलगाव रोडवर राजस्थान ट्रान्सपोर्टसमोर ही कारवाई करण्यात आली आहे. सुमारे १० ते १५ जण ट्रान्सपोर्टसमोर सफारीवाहनासह उभे असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकताच त्यातील १० ते १२ आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले तर पोलिसांनी मोहम्मद शादीक शे.रज्जाक, नावाजीशी अलीबेग उर्फ नय्यद ,वसिम खान व आबीद खान सुभान खान अशा चार जणांना अटक केली आहे. सफारी कारवर हिवाळी अधिवेशन २०१७चे स्टिकर लावण्यात आल्यामुळे पोलिसांनी राजकीय दृष्टीने या घटनेचा तपास सुरु केला आहे. आरोपीच्याविरोधात आर्म अ‍ॅक्ट १०९ व १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या