कोरोनामुक्त झाल्यावर 6 महिन्यांनंतरही गंध आणि चव कळत नाही; 14 वर्षांच्या मुलीच्या समस्येने डॉक्टरही चक्रावले

कोरोना महामारीचा सामना सर्व जग करत आहे. याची लक्षणे आणि त्यानंतर शरीरावर होणारा परिणाम याबाबत संशोधक अभ्यास करत आहेत. हा व्हायरस स्वरुप बदलत असल्याने संशोधकांसोमरही मोठे आव्हान आहे. कोरोनाची लक्षणे आणि त्याचे होणारे परिणाम याबाबत वेगवेगळ्या गोष्टी उघड होत आहेत. गंध आणि चव जाणे ही कोरोनाची लक्षणे काही कोरोनाबाधितांमध्ये दिसतात. मात्र, एक 14 वर्षांची मुलगी कोरोनामुक्त झाल्यावर 6 महिन्यांनंतरही तिला गंध आणि चव कळत नाही. त्यामुळे डॉक्टरही चक्रावले आहेत.

गंध आणि चव न कळणे ही कोरोनाची लक्षणे काही कोरोनाबाधितांमध्ये दिसतात.मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना गंध आणि चव कळायला लागते. काही रुग्णांना तीन ते चार महिने गंध आणि चव कळत नाही. त्यानंतर हळूहळू त्यांची गंध आणि चव घेण्याची क्षमता पूर्ववत होते. अमेरिकेतील मिशीगनमधील 14 वर्षांच्या ग्वेंडालिन केलेन या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सहा महिन्यांपूर्वीच ती कोरोनामुक्त झाली आहे. तरीही गंध आणि चव कळत नसल्याने ती त्रस्त आहे. आपण गंध आणि चव घेण्याची क्षमता कायमची गमावली आहे काय, अशी भीती तिच्या मनात आहे. मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गंध आणि चवीची क्षमता परत मिळवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे चार तेलांचा सुगंध घेण्याचा ती दररोज प्रयत्न करते. मात्र, तेलाचा सुंगध येण्याऐवजी तिला जळालेल्या रबरासारखा वास येतो. विविध प्रकारची फुले आणि खाद्यपदार्थांचाही तिला तसाच वास येतो. जेवतानाही विचित्र वास जाणवून तिला मळमळते आणि उल्टी होईल, असे वाटत राहते. त्यामुळे यापुढे आपण आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकू का, असा सवाल तिने डॉक्टरांना केला आहे.

कोरोनाबाधितांमध्ये गंध आणि चव न कळणे हे लक्षण आढळून येतात. मात्र, कोरोनामुक्त झाल्यावर गंध आणि चव समजण्याची क्षमता परत येते. काही रुग्णांना यासाठी तीन ते चार महिने लागतात. मात्र, केलेनला कोरोनामुक्त होऊन सहा महिने झाल्यानंतरही गंध आणि चव कळत नसल्याने डॉक्टरही चक्रावले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर सहा महिने उलटले असून तिला गंध आणि चव कळत नसल्याने तिने गंध आणि चव घेण्याची क्षमता गमावली आहे, अशी शक्यता नाक, कान आणि घशांच्या तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे तिचे कटुंबिय चिंतेत आहे.

केलेनला ताप, डोकेदुखी, पोटदुखी, उल्टी होणे अशी लक्षणे आढळल्याने तिला शाळेतून घरी पाठवण्यात आले होते. ती कोरोनाबाधित झाल्याचे निदान झाले. औषधोपचारानंतर केलेनचा अहवाल 30 जानेवरीला कोरोना निगेटिव्ह आला होता. त्यानंतर दोन आठवड्यांनी डोकेदुखी, पोटदुखी आणि अंग दुखणे हा तिचा त्रास कमी झाला. मात्र, गंध आणि चव घेण्याची क्षमता परत आलीच नाही.

तिची ही क्षमता परत येण्यासाठी डॉक्टर तिला गंध आणि चव घेण्याचे प्रशिक्षण देत आहे. तिने ही क्षमता गमावल्याची शक्यता असल्याने तिला गंध आणि चव घेण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यासाठी विशेषज्ञांची मदत घेण्यात येत आहे. या प्रशिक्षणानंतर काही प्रमाणात ती गंध आणि चव घेऊ शकेल, असे डॉक्टरांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या