14 वर्षाची मुलगी गरोदर; बॉयफ्रेंड आणि काकांसह सहाजणांकडून लैंगिक शोषण

तमिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीव सहा जणांनी बलात्कार केला असून ती गरोदर झाली आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तमिळनाडूच्या पोल्लच्चि भागात एक 14 वर्षाची मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. तिचे आई वडील मजूरी करून उदरनिर्वाह करत होते, तर मुलगी शाळेत दहावीत शिकत होती. आई वडील मोलमजुरीसाठी बाहेर असल्याने बहुतांश वेळा मुलगी एकटी असायची. तिचे शेजारी राहणार्‍या 16 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. या मुलाने तिच्यावर सर्वप्रथम बलात्कार केला. नंतर तिच्या एका काकानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरूवात केली. कहर म्हणजे पीडित मुलीच्या प्रियकराच्या मित्रांनेही अनेक ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अशा प्रकारे सहा जणांनी तिचे लैंगिक शोषण केले.

एक दिवस पीडित मुलीच्या पोटात अचानक दुखू लागले. जेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ती 5 महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करून सहा जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या