मुंबईत 1 हजार 498 नवे कोरोनाबाधित रुग्ण; 56 जणांचा मृत्यू

740

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत गुरुवारी एका दिवसात कोरोनाचे एक हजार 498 नवे रुग्ण आढळले असून गेल्या 48 तासांत 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 707 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 68 हजार 537 वर पोहोचली आहे. मुंबईत 56 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता 5 हजार 520 झाली आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 22 हजार 694 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 15 हजार 390 चाचण्या झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या