15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याची योजना, आयबीच्या अलर्टनंतर खळबळ

1226

स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) अलर्ट जारी केला असून लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याची योजना सुरू असल्याचे खुलासा केला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी दहशतवादी संघटनेच्या प्रमुखांपैकी एक गुरुवतपंत सिंह पन्नू यांने 14, 15 आणि 16 ऑगस्टला लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकणाऱ्याला सव्वा लाख डॉलर देण्याची घोषणा केली आहे. आयबीच्या या अलर्टनंतर खळबळ उडाली असून लाल किल्ला आणि दिल्लीतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा दहशतवादी गुरुवतपंत सिंह पन्नू याने एक व्हिडिओ जारी केला आहे. 15 ऑगस्टला दिल्लीतील लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवणाऱ्या व्यक्तीला 1 लाख 25 हजार डॉलर (जवळपास 1 कोटी) रुपये देण्याची घोषणा केली आहे. या पन्नूला हिंदुस्थान सरकारने नुकतेच डिजिनेटेड टेरररिस्ट लिस्टमध्ये टाकले होते.

screenshot_2020-08-13-15-25-04-528_com-android-chrome

दहशतवादी गुरुवतपंत सिंह पन्नू पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी मिळून योजना करत आहे. दिल्ली, पंजाब, हरयाणामधील शीख लोकांना ऑटोमेटिक कॉल्स येत असून यावरहु गुप्तचर संस्थांची नजर आहे. या कॉल्सद्वारे पन्नू खलिस्तान चळवळीला आकार देण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर तपास संस्था हाय अलर्टवर आहेत. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या