वडाच्या झाडाचे 15 आरोग्यदायी फायदे

1) चेहरा उजळवण्यासाठी –  वडाची 5-6 पानं घ्या आणि त्यामध्ये साधारण 10-20 ग्रॅम मसूर डाळ मिक्स करून वाटून घ्या. त्यानंतर ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची समस्या असेल तर यामुळे बरी होते. त्याशिवाय तुम्ही जर वडाची पिकलेली पानं, जास्वंदीची पानं आणि लाल चंदन पाण्यात एकत्र करून वाटलं आणि त्याची पेस्ट चेहऱ्याला लावलीत तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स निघून जाण्यासही मदत होते. तसंच पिकलेली वडाची पानं घ्या, त्यामध्ये कमळाचं फूल आणि केशर घाला. पाण्यासह याची पेस्ट बनवून घ्या आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावा. यामुळे तुमचा चेहरा अधिक उजळतो आणि चमकदार बनतो.

2 )कानाच्या समस्या असतील तर-  काही थेंब वडाचा चीक घ्या त्यामध्ये मोहरीचं तेल मिक्स करा. याचे 2-2 थेंब तुम्ही कानामध्ये घाला. यामुळे तुमच्या कानात गेलेले किटाणू नष्ट होण्यास मदत होते. तसंच तुम्हाला कमी ऐकायला येत असेल तर हे किटाणू गेल्याने तुमचे कानही व्यवस्थित साफ होतात. आणि समस्या सुटण्यास मदत होते.

3) केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय –
केसांच्या समस्या तर प्रत्येकालाच असतात. तुम्ही जर वडाचा उपयोग करून पाहिलात तर तुम्हाला लवकर त्याचा परिणाम दिसून येईल. तुम्ही वडाच्या पानांची राख करा आणि साधारण 20 ग्रॅम ही राख घ्या त्यामध्ये तुम्ही लीनसीड ऑईल घाला. नंतर याचं मिश्रण करून तुम्ही तुमच्या डोक्याला लावा आणि मसाज करा. यामुळे तुम्हाला केसगळतीची समस्या असेल तर ती जाऊन पुन्हा नव्याने केस उगवू लागतील. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही वडाची मऊ पानं काढा. ती व्यवस्थित वाटून घ्या. त्यामध्ये मोहरीचं तेल घाला. हे तुम्ही तेलात व्यवस्थित उकळून घ्या. नंतर थंड करून केसांना लावा. केसांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग होतो. वडाची मूळं आणि तीळ समान मात्रेत घ्या. दोन्ही नीट वाटून घ्या आणि केसांना लावा. साधारण अर्धा तास तसंच ठेवा आणि मग त्यावर नारळ आणि भृंगराज तेल लावून मसाज करा. तुमच्या केसांच्या वाढीसाठी हा एक उत्कृष्ट उपाय आहे.

4) नाकातून येणारं रक्त थांबवण्यासाठी-
वातावरण बदलतं तसं बऱ्याचजणांना नाकातून रक्त येण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात. मग अशावेळी नक्की काय उपाय करायचा याची कल्पना नसते. तर यावर तुम्ही नक्कीच घरच्या घरी उपचार करू शकता. ताकासह तुम्ही वडाच्या मूळाची साधारण 3 ग्रॅम पावडर मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही प्यायलात तर तुमच्या नाकातून येणारं रक्त थांबवण्यास याची मदत होते. सर्वात सोपा आणि लवकरात लवकर रक्त थांबवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

5) दाताच्या समस्येवर –
दाताच्या समस्येवर वडाच्या सालांचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. साधारण 10 ग्रॅम सालीची पावडर, 2 ग्रॅम काळी मिरी एकत्र वाटून नीट पावडर करून घ्या. ही पावडर घेऊन तुम्ही ब्रशने दात स्वच्छ करा. तुमचे दात दुखत असतील. तर तुम्हाला यातून सुटका मिळेल. तसंच तुम्ही हा चीक कापसाच्या मदतीने दाताला लावल्यास तुम्हाला लवकर आराम मिळतो. दातांना काही इन्फेक्शन झालं असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता.

6) अति लघवी होत असल्यास त्यावरील उपचार
तुम्हाला जर अति लघवीचा त्रास होत असेल तर तुम्ही वडाच्या झाडांच्या बियांची व्यवस्थित पावडर करून घ्या. त्यातील साधारण 1-2 ग्रॅम पावडर दिवसातून दोन वेळा गायीच्या दुधात घालून प्या. हा डोस कायम ठेवा. त्यामुळे तुम्हाला याचा त्रास कमी होईल.

7) मधुमेहाकरिता –
वडाच्या झाडाच्या सालीची पावडर करा. साधारण 20 ग्रॅम पावडर अर्धा लीटर पाण्यामध्ये मिसळा आणि उकळवा. हे मिश्रण सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही घ्या. साधारण एक महिना तुम्ही हे सतत करा. त्यामुळे तुमचा मधुमेह बरा होईल. मधुमेह हा सध्याच्या लाईफस्टाईलमुळे पटकन कोणालाही होतो. त्यामुळे तुम्हाला यापासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही नक्की वडाच्या सालीच्या पावडरीचा वापर करा.

8) अतिसारावर उपाय –
साधारण 6 ग्रॅम वडाची पावडर घ्या आणि 100 मिली पाण्यात उकळा. त्यामध्ये थोडी साखर मिसळा. ताक पिऊन झाल्यावर तुम्ही हे मिश्रण रूग्णाला द्या. अतिसारावर याचा लगेच परिणाम होतो.

9) नॉशियावर करतो उपचार –
वडाची साधारण काही पानं घ्या आणि त्याचबरोबर 7 लवंग घ्या. पाण्यात व्यवस्थित वाटून घ्या. त्यानंतर हे तुम्ही नॉशिया असणाऱ्या अर्थात ज्याला मळमळ व्हायचा त्रास होतो त्या रूग्णाला द्यावा.

10) मूत्रविकारावर इलाज –
वडाची ताजी पावडर आणि साखर घ्या. ताज्या पाण्यात व्यवस्थित मिक्स करून याचं मिश्रण बनवा अथवा तुम्ही वडाच्या मूळाची पावडर 4 ग्रॅम घ्या आणि दिवसातून दोन वेळा ताज्या पाण्यात मिक्स करून प्या. तुम्हाला वाटणारा अशक्तपणा आणि मूत्रविकाराचा त्रास यामुळे नक्की कमी होईल. यामध्ये पोषक तत्व आणि मिनरल्स असतात.

11) डोळ्यांची सूज करतं कमी –
सतत काम आणि सतत मोबाईवर अथवा लॅपटॉपवर काम करण्याने आजकाल डोळयांवर अथवा डोळ्यांखाली सूज येणं हे खूपच सर्वसाधारण आहे. थोडा चीक घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे मध मिसळा . हे मिश्रण तुम्ही तुमच्या डोळ्यांवर लावा. तुमच्या डोळ्यांवरील सूज कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो.

12) अल्सरवर गुणकारी –
अल्सरमुळे शरीराला जास्त त्रास होत असतो. अल्सरसाठी वडाची पानं घेऊन पाण्यात उकळवा आणि नंतर त्याती पेस्ट करा त्यामध्ये तीळाच्या तेलामध्ये तुम्ही हे गरम करा. अल्सरसाठी हे खूपच गुणकारी आहे. हे तेल तुम्ही दिवसातून 2-3 वेळा अल्सरवर लावा आणि यामुळे अल्सर त्वरीत बरं करण्यासाठी याचा उपयोग होतो.

13) खाजेवर करू शकता उपाय-
साधारण अर्धा किलो वडाची पानं घ्या आणि ती साधारण 4 लीटर पाण्यात रात्रभर ठेवा. त्यानंतर सकाळी ते पाणी एक लीटर होईपर्यंत उकळवा. त्यामध्ये अर्धा लीटर मोहरीचं तेल मिसळा आणि हे तेल तुम्ही नीट बाटलीत भरून ठेवा. या तेलाने मसाज करा. तुम्हाला कोरड्या जागेवर अथवा ओल्या जागेवर कुठेही खाज आल्यास, तुम्हाला याचा वापर करता येऊ शकेल.

14) रक्तस्राव थांबण्यास होते मदत –
बऱ्याचदा काही जणांना अंगावरून रक्त जाण्याचा खूपच त्रास होतो अशावेळी वडाच्या झाडाची पानं उपयोगाला येतात. तुम्ही साधारण 20-25 पानं वाटून त्याची पेस्ट करून घ्या. या पेस्टमध्ये मध आणि साखर घालून मिक्स करून ही पेस्ट खायला द्या. यामुळे त्वरीत रक्तस्राव थांबण्यास मदत होईल.

15) भाजलेल्या जागी उपयोगी –
स्वयंपाकघरात काम करताना आपला हात भाजतो अथवा तेल अंगावर उडून भाजतं. अशावेळी त्वरीत परिणाम होण्यासाठी दह्यात वडाची पानं मिसळून त्याची पेस्ट भाजलेल्या ठिकाणी लावा. त्वरीत आराम मिळेल. जळजळ कमी होईल