गडचिरोलीत 16 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 155 वर

518

गडचिरोली जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या कुरखेडा येथील आणखी 6 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 1 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे. नागपूर, भंडारा व अमरावती येथून आलेल्या 6 जणांचे अहवाल शुक्रवारी दुपारी पॉझिटिव्ह आले. तसेच चामोर्शी येथील एकजण हैद्राबाद येथून गावी आला होता. त्याला चामोर्शी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तसेच अहेरी येथे एका नोकरदाराचा जिल्ह्यातून परतल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील सर्व प्रवासी संस्थात्मक विलगीकरणात होते.

जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 89 आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 65 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 155 झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या एकुण सर्व 98 रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. यामध्ये 9 जिल्ह्याबाहेरील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सर्व रुग्ण मिळून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 164 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या