अरे बापरे…! एकाचवेळी गर्भवती झाल्या हॉस्पिटलमधील 16 नर्स

सामना ऑनलाईन । अरिजोना

हॉस्पिटलमधील रुग्णांची काळजी घेण्याची सर्वात मोठी जबाबदारी तेथील नर्सिंग स्टाफवर असते. कोणत्याही रुग्णाला काही हवं नको ते पाहण्याचं काम डॉक्टरांपेक्षा नर्सिंग स्टाफकडे असते. परंतु अमेरिकेतील अरिजोना प्रांतातील एका हॉस्फिटलसमोर एक मोठा बाका प्रसंग उभा राहिला आहे. येथील एका हॉस्पिटलमधील आयसीयूत काम करणाऱ्या सर्वच्या सर्व नर्स एकाचवेळी गर्भवती राहिल्या आहेत. हॉस्पिटल प्रशासनाला याची माहिती फेसबूकच्या माध्यमातून मिळाली.

हफिंगटन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, अरिजोना प्रांतातील मीसा येथील डिजर्ड मेडिकल सेंटरमध्ये आयसीयूत काम करणाऱ्या 16 नर्स एकाचवेळी गर्भवती राहिल्या आहेत. या सर्व नर्स हॉस्पिटलमधील अतिसंवेदनशिल विभागात काम करतात. परंतु एकाचवेळी या सर्व गर्भवती राहिल्याने हॉस्पिटलसमोर मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे. डॉक्टरांच्या मते या सर्व नर्स ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान आई होतील आणि काही दिवसात त्या 12 आठवड्यांच्या मातृत्व रजेवर जातील. परंतु एकाचवेळी आयसीयूतील या सर्व नर्सला सुट्टी कशी द्यायची हा प्रश्न हॉस्पिटल प्रशासनापुढे उभा राहिला आहे. सध्या हॉस्पिटल प्रशासन जुन्या आणि काही नव्या नर्सला ट्रेनिंग देण्याची तयारी करत आहे.