बुलढाण्यात 17 नवे रुग्ण; 131 अहवाल कोरोना निगेटिव्ह

598

बुलढाण्यातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण 148 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 131 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 आणि रॅपिड टेस्टमधील 16 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 80 तर रॅपिड टेस्टमधील 51 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 131 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह अहवालांमध्ये रामनगर नांदुरा येथील 33 वर्षीय पुरूष, बारादरी मलकापूर येथील 32 वर्षीय महिला, मलकापूर येथील 25 वर्षीय पुरूष, इकबाल चौक बुलडाणा येथील 43 वर्षीय पुरूष, सुरभी कॉलनी शेगांव येथील 22 वर्षीय पुरूष, दाल फैल खामगाव येथील 35 व 47 वर्षीय महिला, टिपु सुलतानपूरा शेगांव येथील 26 वर्षीय पुरूष, आळसणा ता. शेगांव येथील 16 वर्षीय मुलगा, शेलूद ता. चिखली येथील 62 व 45 वर्षीय महिला, 19 वर्षीय मुलगा, चिखली येथील 21 वर्षीय पुरूष, तसेच सिनगांव जहागीर ता. दे. राजा येथील 45 वर्षीय पुरूष, जुना जालना रोड दे. राजा येथील 48 वर्षीय पुरूष, शेगांव रोड खामगांव येथील 55 वर्षीय पुरूष व नॅशनस हायस्कूलजवळ खामगाव येथील 40 वर्षीय पुरूष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 17 रूग्ण आढळले आहेत.

गुरुवारी 10 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये पारपेठ मलकापूर येथील 8 वर्षीय मुलगा, अमोना ता. चिखली येथील 30 वर्षीय पुरूष, साखरखेर्डा ता. सिं.राजा येथील 10 वर्षीय मुलगा, 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, मुळ पत्ता देऊळगाव ता जामनेर जि. जळगांव येथील 65 वर्षीय महिला, शक्तीनगर मलकापूर येथील 75 वर्षीय पुरूष, नांदुरा येथील 28 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत 3560 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 215 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशाप्रकारे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 215 आहे.

गुरुवारी 219 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2698 आहेत. जिल्ह्यात सध्या 377 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 215 कोरोनाबाधित रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 147 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 15 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या