कोरोना संकट काळात शेतकर्‍यांना दिलासा, केंद्राकडून 17 हजार कोटींचे पॅकेज

820
प्रातिनिधिक फोटो

कोरोना संकटकाळात केंद्र सरकारने शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकर्‍यांसाठी 17 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. देशातील साडे आठ कोटीहून अधिक शेतकर्‍यांना या पॅकेजचा फायदा होईल.

पंतप्रधान सन्मान निधी अंतर्गत साडे आठ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 17 हजार कोटी रुपये जमा करण्यात येतील. गेल्या दीड वर्षात या योजनेअंतर्गत 75 हजार कोटी रुपये थेट शेतकर्‍यांच्या खातात जमा करण्यात आले आहेत अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. तसेच 75 हजार कोटींपैकी 22 हजार कोटी रुपये लॉकडाऊन दरम्यान शेतकर्‍यांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

या योजनेच्या शुभारंभाप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की या योजनेमुळे शेतकरी समुख, समिती, कृषी उत्पादनांसाठी गोडाऊन बनवणे, कोल्ड स्टोरेज, अन्न प्रक्रिया संबंधित उद्योगांसाठी एक लाख कोटींची मदत मिळेल. पूर्वी e-NAM च्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक मोठी व्यवस्था बनवण्यात आली होती. आता कायदा करून शेतकर्‍याचा माल हा करमुक्त करण्याला आल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या