अल्पवयीन पित्याने केली २ महिन्यांच्या मुलाची हत्या

21
फोटो प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एका १७ वर्षीय पित्याने २ महिन्यांच्या मुलाची जमिनीवर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. दिल्लीतील मंगोलपुरी येथे ही घटना घडली आहे. जन्मलेला मुलगा आपला नाही, या संशयावरून अल्पवयीन पित्याने मुलाची हत्या केली आहे.

दिल्लीतील मंगोलपुरी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे त्याच्याच शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. हे दोघे गेल्या वर्षी घरातून पळून गेले होते. घरातून पळून गेल्यानंतर ते दोघेही काही काळ एकत्र राहत होते. दरम्यान, मुलगी गर्भवती झाली आणि या वर्षी तिने मुलाला जन्म दिला.

पण, हे जन्माला आलेलं मूल आपलं नाही, असा या आरोपीचा संशय होता. त्यावरून त्याचे बाळाच्या आईशी सतत वादही होत असत. शनिवारी याच मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. यावेळी रागाच्या भरात असलेल्या या अल्पवयीन मुलाने त्याच्या २ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटलं आणि त्याची निर्घृण हत्या केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या