ही” चप्पल करणार महिलांचे संरक्षण

14

सामना ऑनलाईन। हैदराबाद

देशभरात महिलांवरील अन्यायांच्या घटनेत वाढ होत आहे. त्यातही महिलांची छेड काढण्याचे प्रकार सरासपणे घडत असतात. अशा रोडरोमियोंना कायमची अद्दल घडवण्यासाठी हैदराबाद येथील सिध्दार्थ नावाच्या एका १७ वर्षीय मुलाने इलेक्ट्रोशूज’ नावाची चप्पल तयार केली आहे. जी बसताच रोडरोमियोला जोरदार झटका बसेल व महिलेची छेड काय पण तो तिच्याकडे बघण्याचही धाडस करणार नाही.

संपूर्ण देशाला हादरवणारे निर्भया प्रकरण जेव्हा घडले तेव्हा सिध्दार्थ छोटा होता. पण आजूबाजूचे वातावरण बघून नक्कीच काहीतरी भयंकर घडल्याचे त्याला कळत होते. त्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी तो आईबरोबर एका मोर्चात गेला. त्याचवेळी त्याने महिलांच्या सुरक्षेसाठी वस्तू तयार करण्याचे ठरवले. त्यानंतर त्याने इलेक्ट्रोशूज’ नावाची चप्पल तयार केली . विशिष्ट तंत्र वापरुन तयार करण्यात आलेली ही चप्पल बॅटरीवर चालते. पण पायात ती जितका वेळ असेल तितकावेळ  ती आपोआप चार्ज होत राहणार आहे. या चपलेत अजून काही सुविधा उपलब्ध करुन देण्याचा सिध्दार्थचा मानस असून तो त्यावर काम करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या