मुंबईत आणखी 1725 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 30,359वर

496

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून आणखी 1725 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 359 वर पोहोचली आहे. गेल्या एकाच दिवसांत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची एकूण संख्याही 988 झाली आहे.

मुंबईत कोरोनाने मृ्त्यू झालेल्या 39 जणांमध्ये 20 पुरुष आणि 19 महिलांचा समावेश आहे. मृतांमधील 16 जणांचे वय 60 वर्षांहून जास्त होते, तर उर्वरित 23 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. शिवाय 24 जणांना दीर्घकालीन आजारही होते, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नवीन नोंद झालेल्या 1725 रुग्णांमध्ये 21 ते 22 मे रोजी चाचणी झालेल्या अहवालांतून पॉझिटिव्ह ठरलेल्या 359 अहवालांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढ झाली असली तरी गेल्या एकाच दिवसांत तब्बल 598 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांचा आकडा 8074 झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या