महापालिकेचा १७६ कोटींचा कर थकवला

30

भिवंडीतील टोरंटो कंपनीची चार कार्यालये सील

सामना ऑनलाईन, भिवंडी –

शहरातील लाखो ग्राहकांना वीज वितरण करून त्यांच्याकडून बिले वसूल करणाऱया टोरंटो कंपनीने भिवंडी महापालिकेचा १७६ कोटी रुपयांचा कर थकवला आहे. वारंवार नोटिसा पाठवूनही कर न भरल्याने आज अखेर टोरंटो कंपनीच्या शांती नगर, नारपोली, अंजूर फाटा, कल्याण रोड येथील चार कार्यालयांना सील ठोकले. या कारवाईमुळे कंपनीच्या बेफिकीर अधिकाऱयांना सणसणीत चपराक बसली आहे.
भिवंडी शहराला विजेचे वितरण करण्याचा व वीज बिल वसुलीचा ठेका २६ जानेवारी २००७पासून दिला आहे. दहा वर्षांच्या काळात एस.टी., एल.टी. पोल, ट्रान्सफॉर्मर, केबल्स आदींच्या कामाचे भाडे महापालिकेला भरलेच नाही. एवढेच नव्हे तर मालमत्ता करही थकवला. एकूण १७६ कोटी ५० लाख ९२ हजार ६१६ रुपये देणे बाकी होते. ते न दिल्याने आयुक्त म्हसे यांच्या आदेशानुसार टोरंटो कंपनीच्या कार्यालयांना सील ठोकण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या