दिल्ली विमानतळावर 18 सीआयएसएफ जवानांना कोरोनाची लागण

547

देशात कोरोनाचे संकट वाढत आहे. दिल्ली विमानतळावर तैनात असलेल्या 18 सीआयएसएफ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व जवानांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे.

लॉकडाऊनदरम्यान देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली होती. अशा वेळी गेल्या 24 तासांत दिल्ली विमानतळावर 18 सीआयएसएफ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. गाझियाबादमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दिल्लीच्या इतर भागात दोन रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाचे रुग्ण आढळल्याने दिल्ली गाझियाबाद सीमा सील करण्यात आली आहे. लोकांना ओळखपत्र दाखवल्याशिवाय पोलीस प्रवेश देत नाही. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या